पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकिया आणणार पॉप-अप सेल्फी कॅमेरा फोन

नोकिया ८.२

एचएमडी ग्लोबल सध्या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनी लवकरच नोकिया ८.२ स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असणार आहे. पॉप अप सेल्फी कॅमेरा  असलेला हा नोकियाचा पहिलाच फोन आहे.

कमी रॅमच्या मोबाईलसाठी आता पबजी लाईट भारतात 

मायस्मार्टप्राइजच्या वृत्तानुसार नोकिया ८.२ मध्ये ३२ मेगापिक्सेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असणार  आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोअरेजही असणार आहे. या वर्षभरात लाँच झालेल्या वनप्लस ७ प्रो, शाओमी रेडमी के२० प्रो, विव्हो यांसारख्या फोनमध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे. नोकियाचा नवा फोन वर्षाअखेर लाँच होण्याची शक्यता आहे. 

सोनीनं लाँच केला फोनच्या आकाराचा एसी, कुठेही घेऊन फिरू शकता

नोकिया  ही एकेकाळची भारतातली अग्रगण्य मोबाइल कंपनी होती. मात्र अँड्राइड फोनच्या जमान्यात  नोकिया मागे पडली. त्यानंतर सॅमसंग आणि हल्लीच्या काळात शाओमीनं भारतीय बाजारपेठेत आपलं बस्तान बसवलं आहे. आता स्मार्टफोनच्या स्पर्धेत नोकियादेखील उतरली आहे. 
गेल्यावर्षी नोकियानं ८.१ हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत १९,९९९ होती. लवकरच लाँच होणाऱ्या नव्या फोनची किंमत ही यापेक्षा अधिक असू शकते.