पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'स्मार्टफोन'ला कंटाळलेल्यांसाठी नोकियाचा ११० नवा पर्याय

नोकिया ११०

हल्ली फोन हा केवळ संपर्काचं उपकरण न राहता, तो  खऱ्या अर्थानं स्मार्ट झाला आहे. एकमेकांना कॉल्स करणं किंवा मेसेज पाठवणं इतका त्याचा मर्यादीत वापर न राहता त्याद्वारे आपण व्हिडीओ कॉल्स करणं, फोटो पाठवणं,  बिल भरणं, वेळापत्रक तयार करणं, चॅटिंग करणं सारखी असंख्य कामं करु शकतो. किंबहुना हा 'स्मार्टफोन' आपल्या लाईफस्टाइलचा अविभाज्य भागच बनला आहे. 

शाओमीच्या रेडमी नोट ८ प्रो मध्ये ६४ मेगापिक्सेल कॅमेरा

मात्र तुम्हाला या स्मार्टफोनचा कंटाळा आला असेन तर तुमच्यासाठी नोकियानं नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. नोकियानं आपला ११० हा फोन लाँच केला आहे. जो येत्या १८ ऑक्टोबर पासून सर्वत्र उपलब्ध होणार आहे. ओशन ब्लू, ब्लॅक आणि पिंक रंगात उपलब्ध असलेल्या या फोनची किंमत १ हजार ५९९ रुपये आहे. 

पगारापेक्षा आजच्या पिढीला हवीये नोकरीत स्थिरता

१.७७ इंचाचा डिस्प्ले, एफएम, ८00mAh बॅटरी आहे. नोकियानं दीर्घकाळ बॅटरी टिकण्याचं आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना केवळ फोन करण्यासाठी फोन हवा आहे अशा व्यक्तींसाठी हा फोन उत्तम असल्याचं एचएमडी ग्लोबलचे सीपीओ म्हणाले.