पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

४८ मेगापिक्सेल विसरा, शाओमी आणणार ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असणारा फोन

शाओमीनं शेअर केला टीझर

शाओमी कंपनीनं गेल्याच आठवड्यात आपले बहुप्रतिक्षित असे दोन फोन  लाँच केले. हे फोन म्हणजेच Redmi K20 Pro आणि Redmi K20 होय. हे फोन २२ जुलैपासून भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ४८ मेगापिक्सेल कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. आता लवकरच  शाओमी ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन लाँच करण्याच्या विचारात आहे.

...म्हणून Redmi K20 Pro, Redmi K20 ची किंमत सर्वाधिक, कंपनीचा खुलासा 

कंपनीच्या विबो या चीनी सोशल मीडिया अकाऊंवर एक टीझर शेअर करण्यात आला आहे. ज्यात मांजरीचा फोटो आणि तिच्या डोळ्याचा झूम लूक आहे. या टीझरद्वारा शाओमीनं ६४ मेगापिक्सेल फोन आणणार असल्याच्या वृत्तावर शिक्का उमटवला आहे. 

इनकॉग्निटो मोडमध्येही तुमचा माग काढणे शक्य, गुगलकडून लवकरच सुधारणा

यापूर्वी सॅमसंगनं ६४ मेगापिक्सेल इमेज सेन्सॉर  स्मार्टफोनसाठी लाँच केला होता. त्यानंतर लगेच शाओमीनं  ६४ मेगापिक्सेल  कॅमेरा येणार असल्याची घोषणा केली. शाओमीबरोबरच रिअलमीदेखील ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला फोन लाँच करण्याच्या विचारात आहे.