पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच येणार दीर्घकालीन प्लॅन्स

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्स वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नेटफ्लिक्सवर दीर्घकालीन शुल्काचे प्लॅन्स उपलब्ध होणार आहेत. यामध्ये तीन महिन्यांचे, सहा महिन्यांचे आणि एका वर्षाच्या प्लॅन्सचा समावेश आहे. या प्लॅन्सची सध्या चाचणी घेतली जात आहे. त्यामुळे निवडक ग्राहकांसाठीच ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण लवकरच ते सर्व ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत, असे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. पण हे प्लॅन्स कधी उपलब्ध होणार याची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही.

आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का?- संजय राऊत

नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, जास्तीत जास्त महिन्यांचे शुल्क एकदाच भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्याचा नेटफ्लिक्स वापरणाऱ्या ग्राहकांना फायदाच होणार आहे. सध्या आम्ही केवळ चाचणी घेत आहोत. जर ही चाचणी यशस्वी झाली तरच आम्ही सर्व ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊ.

GST च्या टप्प्यांमध्ये लवकरच मोठा बदल; मोबाईल, रेल्वे प्रवास महागणार

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, नेटफ्लिक्सचे दीर्घकालीन प्लॅन्स हे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये ग्राहकांची २० ते २५ टक्क्यांची बचत होऊ शकते. याच वर्षी नेटफ्लिक्सने फक्त मोबाईलसाठीचे प्लॅन्स भारतात सुरू केले. १९९ महिना असा हा प्लॅन आहे.