पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनचा नेटफ्लिक्सला फायदा, सबस्क्रायबरच्या संख्येत घसघशीत वाढ

नेटफ्लिक्स

लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टींचा वेग मंदावला आहे. अब्जावधी लोक कोरोना विषाणूच्या संकटामुळे लॉकडाऊन आहेत. अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अशावेळी ओटीपी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सला मात्र लॉकडाऊनचा भरपूर फायदा होत आहे.

वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख

पहिल्या तिमाहित नेटफ्लिक्सच्या पेड म्हणजेच पैसे देवून सेवा विकत घेणाऱ्या सबस्क्रायबरच्या संख्येत १ कोटी ५७ लाख ७० हजार इतकी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहित ७० लाख पेड सबस्क्रायबर येतील असा अंदाज होता, मात्र त्यापेक्षाही हा आकडा दुप्पटीनं वाढला आहे. आताच्या घडीला नेटफ्लिक्सच्या पेड सबस्क्रायबरचा आकडा हा १८ कोटी, २८ लाखांवर पोहोचला आहे.

पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री

कंपनीच्या आलेखात २२.५% वाढ होत आहे. येत्या काही महिन्यात नेटफ्लिक्सची सेवा वापरणाऱ्या सबस्क्रायबर संख्येत आणखी वाढ होईल अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे.