पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्वचेसाठी वरदान आहे कडुनिंब

कडुनिंब

कडुनिंबाला आयुर्वेदात खूपच मोलाचं स्थान आहे. या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सगळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं त्याला वृक्ष औषधालय असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे ज्यांना आपल्या त्वचेचं सौंदर्य खुलवायचं असेल त्यांच्यासाठी  कडुनिंब म्हणजे वरदान होय.

रक्त शुद्ध होते
रक्त शुद्ध करण्यासाठीही  कडुनिंबाचा उपयोग होतो.  रक्त शुद्ध झाल्यानं त्वचेच्या अनेक समस्या या दूर होतात.

मुरुम, पुरळ दूर होते 
कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर आलेले मुरुम, पुरळ यामुळे दूर होतात. त्यामुळे सौंदर्यप्रधानांपेक्षा मुरुम दूर करण्यासाठी कडुनिंब हे अधिक फायदेशीर असतं.

Tips : घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?

त्वचा रोगावर रामबाण
कडुनिंब तेलात फॅटी अ‍ॅसिड व ई जीवनसत्त्व आहेत  त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बऱ्या होतात.

केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम
कडुनिंबाच्या पानांची पेस्ट ही केसांसाठी उत्तम कंडिशनर आहे. त्याचप्रमाणे कडुनिंबाची पानं उकळवून त्या पाण्यानं केस धुतल्यास घामामुळे येणारे खाज दूर होते. तसेच कोंड्याची समस्याही निघून जाते.

गरम पाण्यानं आंघोळ केल्याचे हे चार फायदे