पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Navratri 2019 : शिंगाड्याच्या पीठाचा हलवा

शिंगाड्याच्या पीठाचा हलवा

नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेकांचे उपवास असतात. काहीजण काही न खाता उपवास करतात. तर काही केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. नवरात्रीच्या काळात शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ. 

साहित्य
१ वाटी शिंगाड्याचं पीठ 
१ वाटी साखर
१ वाटी तूप
३ वाट्या पाणी 
वेलची पावडर 
सुका मेवा 

सकाळी राजाप्रमाणे न्याहारी करावी का?

कृती 
- एका तव्यात थोडं तूप गरम करून त्यात सुका मेवा परतून घ्यावा.
- सुका मेवा बाजूला काढून ठेवावा
- या तूपात थोडं आणखी तूप वाढवून शिंगाड्यात पीठ परतून घ्यावं.
- मंद आचेवर शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजून घ्या.
- एका भांड्यात  ३ वाट्या पाणी उकळत ठेवावं, यात साखर टाकून पाक तयार करून घ्यावा.
- शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजलं की त्यात साखरेचा पाक घालावा. मध्यम आचेवर  दहा मिनिटे हे मिश्रण परतवून घ्यावं. त्यात तूपावर परतवलेला सूका मेका टाकावा आणि गरमागरम हा हलवा सर्व्ह करावा.