पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांचा कार पुलिंगकडे वाढतोय कल

मुंबई वाहतूक कोंडी

सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या जगभरातील शहरात मुंबईचाही समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या  शहरात वाहतूक कोंडी ही मुंबईकरांची मोठी समस्या आहे. तासन् तास या वाहतूक कोंडीत मुंबईकर अडकून पडतात. त्यामुळे आता मुंबईकरांचा कल हा कार पुल सेवेकडे वाढत चालला आहे असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

मारुतीची एस-प्रेसो कार लाँच; ४ लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध

दिवसेंदिवस मुंबईची वाहतूक व्यवस्था अधिकच डोकेदुखी ठरत असल्याने यावर आता वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. यामध्ये मेट्रो,ओला- उबर पर्यायाने ऍप बेस्ड टॅक्सी यांसारखे नवीन पर्याय मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत दाखल झाले आहेत. आता पूल कॅब हा आणखी एक नवा पर्याय मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फायदेशीर ठरत असून मुंबईकरांकडून देखील या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे 'क्विक राईड' या पूल कॅब सर्विस देणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.

मुंबईबरोबरच पुणे, दिल्ली राजधानी परिसर,  हैदराबाद, चेन्नई, कोची आणि कोलकाता या देशातील प्रमुख शहरांमधून या सेवेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  गेल्या दीड वर्षांत यामध्ये दरमहा तब्बल २०० टक्के वाढ होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. काल पूल सेवेमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट होण्यास हातभार लावला जाणार आहे. विशेष म्हणजे कार पूल सेवा वापरणाऱ्यांमध्ये 21% प्रमाण हे स्त्रियांचे आहे. असे 'क्विक राईड'च्या निष्कर्षातून समोर आले आहे. 

ईडी, सीबीआय हे भाजपच्या विजयाचे मजबूत आधारस्तंभः संजय राऊत

कार पुलिंगचे फायदे
- रस्त्यावर नवीन वाहनांची भर पडत नाही
- रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत
- कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमी
- प्रवास अधिक सुखकर
- मोबाईलवरून बुकिंग सहज शक्य
कार पूल सेवा, कार पुलिंग,