पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या Motorola One Action ची किंमत आणि फीचर्स

मोटोरोला वन अ‍ॅक्शन

मोटोरोला वन अ‍ॅक्शन मोबाईल भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईलची विक्री ३० ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे. हा मोबाईल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणार असून त्यांची किंमत फक्त १३ हजार ९९९ रुपये ऐवढी आहे. हा मोबाईल युजर्सना तीन रंगात उपलब्ध होणार आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटनरल मेमरी आहे. या मोबाईलला मागच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

या मोबाईलमध्ये अल्ट्रा वाइड अँगलसह अनेक नवीन फीचर्स मिळणार आहे. या मोबाईलच्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाले तर, हा मोबाईल ६.३ इंचचा असून त्याला फुल-एचडी आणि आईपीएस सिनेमाविजन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्यूशन १०८०x २५२० पिक्सेल आहे. हा मोबाईल अँड्रॉइड ९ पायवर चालतो आणि यामध्ये अँड्रॉइड १० आणि ११ चे अपडेट देखील  मिळण्याची शक्यता आहे. या मोबाईलमध्ये ऑक्टा कोअर सॅमसंग एक्सिनोस 9609 प्रोसेसरसह माली जी ७२ एमपी 3 जीपीयू देण्यात आला आहे. 

दिल्लीतील निगमबोध घाटावर जेटलींवर उद्या अंत्यसंस्कार

या मोबाईलच्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे झाले तर, या मोबाईलचा कॅमेरा सेटअप इतर मोबाईलपेक्षा जरा वेगळा आहे. हा कॅमेरा सेटअप अॅक्शन शॉट्स कॅप्चर करण्सासाठी बनवण्यात आला आहे. मोबाईलच्या मागे १२ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ज्याचे लेन्स एफ/१.८ अपर्चर आहे. यासोबतच एक अॅक्शन कॅमेरा सुध्दा आहे. त्याचे लेन्स एफ/२.२ अपर्चर आहे. या व्यतिरिक्त यामध्ये ५  मेगापिक्सेलचे डेप्थ सेन्सॉर दिले आहे. सेल्फी काढणाऱ्यांसाठी या मोबाईलमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन