पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करा पण..

पावसाळा मेकअप

पावसाळा म्हटलं अनेक जण नवी स्टाईल, नवा लूक ट्राय करण्यासाठी कचरतात. कारण पावसामुळे आपले ट्रेंडी कपडे, मेकअप खराब होईल याची भीती अनेकांना असते. ही भीती रास्त देखील आहे. पण चिंता करण्याची गरज नाही कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. तस मेकअपलाही आहे. खास पावसासाठी अनेक वॉटरप्रुफ सौंदर्यप्रसाधनं बाजारात उपलब्ध आहेत ती तुम्ही मेकअप करताना नक्की ट्राय करू शकता.  चला तर मग जाणून घेऊयात पावसाळ्यात मेकअप करण्यापूर्वी उपयोगी येणाऱ्या काही हलक्या फुलक्या टीप्स 

Style Tips : पावसाळ्यातही बिंधास्त करा स्टाईलिस्ट गेटअप

- मेकअप करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे शक्यतो कमीत कमी मेकअप आणि साधा लूक ठेवण्याचा प्रयत्न करा. 
- पावसाळ्यात क्रिम बेस सौंदर्यप्रसाधनं वापरणं टाळा, कारण आर्द्रता असल्यानं चेहरा अधिक तेलकट दिसू लागतो.
- अशावेळी पावडर बेस सौंदर्यप्रसाधनं वापरा. कारण पावडर तेलकटपणा शोषून घेते. आर्द्रता असल्यानं पावडर बेस फाऊंडेशन चेहऱ्यावर टिकूनही राहतात. 
- लिपस्टिकचे  रंग निवडताना या मोसमात गडद आणि ग्लॉसी शेड्स असणाऱ्या लिपस्टिक वापरणं टाळा. त्याऐवजी  मॅट शेड्सनां प्राधान्य द्या.
- पिंक, सॉफ्ट ब्राऊन अशा शेड्स निवडा. मात्र तो क्रिम किंवा ग्लॉस बेस असता कामा नये हे लक्षात ठेवा. 
पावसासाठी वॉटरप्रुफ मस्कारा वापरा. कलर  पेन्सिलचाही तुम्ही वापर करू शकता.