पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात २०२५ पर्यंत इंटरनेट सेवांचे दर तिप्पट होण्याची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

भारत ही स्मार्टफोन  आणि  टेलिकम्युनिकेशन  सेवा पुरवणाऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे.  भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवेचे दर अत्यल्प  ठेवले आहे. सध्या अनेक कंपन्या ग्राहकांना ठाराविक जीबी पर्यंत मोफत इंटरनेट सेवा देत आहेत.  त्याचप्रमाणे इंटरनेट सेवांचे दर हे भारतात खूपच कमी आहेत. त्यामुळे कमी किमतीत इंटरनेट सेवा उपलब्ध होत असल्यानं तिचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे.  मात्र २०२५ पर्यंत भारतात इंटरनेट सेवांचे दर तिप्पट होण्याचं भाकीत Ericsson Mobility नं वर्तवलं आहे. 

१ डिसेंबरपासून मोबाइल इंटरनेट सेवा महागणार

गेल्या काही वर्षांत भारतात महिन्याला सरासरी  इंटरनेट सेवा वापरणाऱ्यांची  संख्या वाढली आहे, ही संख्या जगभरातील वापरकर्त्यांपेक्षा अधिक असल्याचं Ericsson Mobility नं नमूद केलं आहे. मोबाईल इंटरनेट सेवांच्या कमी किमती, परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन आणि त्यावर व्हिडिओ  पाहणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे इंटरनेट सेवांचा वापर वाढत चालला आहे, असं निरिक्षण Ericsson Mobility नं नोंदवलं आहे. 

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणार काही महत्त्वाचे फीचर

२०२५ पर्यंत भारतात 4G आणि 5G वापरणाऱ्यांची संख्या अधिक असेल आणि तोपर्यंत सध्या  स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या इंटरनेटचे दर वाढले असतील असं या  सर्व्हेक्षणात म्हटलं आहे.