पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोण म्हणतं कुर्ता स्टाइलिस्ट नाही?

(छाया सौजन्य : इन्स्टाग्राम)

अगदी दोन- तीन वर्षांपूर्वी कुर्ता- पायजमा अनेक मुलांना आउट ऑफ फॅशन वाटत होता. लग्नसराई किंवा तसाच काहीसा खास सोहळा असल्यास ठेवणीतला भरजरी  कुर्ता बाहेर काढला जातो. त्यापलीकडे कुर्त्यांचा ट्रेंड रोजच्या आयुष्यात तसा विशेष रुळला नव्हता. मात्र आता कुर्त्यांचा ट्रेंड पुरुषांच्या फॅशनमध्ये चर्चेत आहे. विशेष म्हणजे अनेक फॅशन डिझाइनर आणि स्टाइलिस्टनं कुडत्यांना एक हटके लूक दिला आहे. 

लग्न ठरलंय, हे आहेत वेडिंग मेकअपचे २०२० मधले खास ट्रेंड

विशेषत: मराठी अभिनेते कुर्त्यांच्या फॅशनमध्ये नवे प्रयोग करून पाहत आहेत. त्यामुळे तुम्हाला यंदाच्या लग्नसराईसाठी  काही नव्या कल्पना हव्या असतील तर मराठी सेलिब्रिटींचे हे कुर्त्यांमधील हटके लूक नक्की ट्राय करा. 

पेस्टल आणि ब्राइट शेड्स
पेस्टल आणि रंगातल्या काही ब्राइट शेड्सचं कॉम्बिनेशन अफलातून दिसतं. त्यामुळे फॅशनमध्ये वेगळे प्रयोग करुन पाहण्याइतके बोल्ड तुम्ही असाल तर हा लूक ट्राय करुन पहायला हरकत नाही. 

साधा पण प्रभावी
तुम्हाला ट्रेंडीही दिसायचंय आहे आणि फार प्रयोग न करता सेफ झोनमधली फॅशन निवडायची असेल तर हा साधा पण तितकाच  प्रभावी कॉटन कुर्त्यांमधला लूक ट्राय करायला हरकत नाही.  

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा

फ्युजन लूक 
कोण म्हणतं  वेडिंग पार्टीसाठी कुर्ता हा चांगला पर्याय नाही.  ट्रेडिशनल आणि वेस्टर्नचा मिलाफ करुन तुम्ही एक छान लूक तयार करु शकता. हा इतरांपेक्षा हटके ठरेल हे नक्की.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जेंव्हा गोपाळ आनंदी असतो . Styles by @sotakha ... Tussi kamaaaal ho😙

A post shared by Lalit Prabhakar (@lalit.prabhakar) on

नवीन कट
चायनीज कॉलरमधला कुर्त्यांचा  ट्रेंड जरा बाजूला ठेवून वेगवेगळ्या कटचे कुडते तुम्ही प्रयोग म्हणून ट्राय करु शकता. विशेषत: कॉटनमध्ये हे कुडते उठून दिसतात.