कोरोना विषाणू बाधित किंवा कोविड १९ आजार झालेल्या रुग्णांना मलेरिया रोधक औषधे दिल्याने त्यांच्या ह्रदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्रदय स्पंदनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका यांना मलेरियारोधक औषधे देण्यासंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने काही निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे.
'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना मलेरियारोधक हायड्रोक्सीक्लोरोक्वीन किंवा अझिथ्रोमायसिन हे एँटिबायोटिक देण्याचे दुष्परिणाम असल्याचे अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे ह्रद्याच्या स्पंदनांवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ओरेगॉन आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ तसेच इंडियाना विद्यापीठ या दोन्ही ठिकाणच्या संशोधकांनी ही औषधे दिल्यावर डॉक्टरांनी रुग्णांच्या ह्रदयाची स्पंदने, त्याची कार्यात्मकता यावर लक्ष ठेवावे, असे म्हटले आहे.
कोरोनाशी लढाई: २.२ अब्ज लोकांकडे सतत हात धुवायला पाणीच नाही
कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांकडून यावरील लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण लस उपलब्ध व्हायला आणखी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी आणि संशोधकांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.