पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Holi 2020 : घरच्या घरी तयार करा नैसर्गिक रंग

होळी २०२०

होळीनंतर दुसऱ्या दिवशी येणारा धूलीवंदनाचा सण सर्वांनाच प्रिय. या दिवशी रंग खेळले जातात. विविध रंगांच्या रंगात सारेच जण न्हाऊन निघतात. हल्ली नैसर्गिक  रंगांकडे जास्त भर दिला जात आहे.  नैसर्गिक रंग हे त्वचेसाठी हानिकारक नसतात. याउलट बाजारात मिळणाऱ्या रसायनयुक्त रंगांमुळे त्वचेला हानी पोहचू शकते, म्हणूनच नैसर्गिक रंग वापरण्याकडे अधिक भर असतो. विशेष म्हणजे हे रंग तुम्ही घरीही तयार करु शकता. 

कोरोनाच्या भीतीनं जगभरातील लोकांच्या सवयीत झाले हे बदल

चला तर जाणून घेऊयात काही सोप्या टीप्स 
पिवळा रंग : दोन मोठे चमचे हळद पावडर घ्या ही पावडर चार चमचे बेसनमध्ये मिक्स करा, पिवळा रंग तयार होतो. विशेष म्हणजे हा रंग तुमच्या त्वचेसाठी स्क्रब म्हणूनही उपयुक्त आहे. 
हिरवा रंगा : तुम्ही पुदीना, पालकच्या रसापासून हिरवा रंग तयार करू शकता. या पानांचा रस काढून तो पाण्यात मिसळा, गडद हिरवा रंग तयार होईल.
 बीट- बीटपासून तुम्ही गडद लाल रंग तयार करु शकता किंवा होळीच्या काही दिवस आधी बिट किसून तो चांगला सुकवून घ्या. बीटचा किस चांगला वाळला की त्याची मिक्सरला बारीक पुड करून घ्या,  पावडर रंग तयार होईल.
गडद निळा - हल्ली बाजारात तुतीची फळं मिळतात या फळांचा रस पाण्यात मिक्स करून गडद निळा जांभळा रंग तयार करू शकता.