पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपचे दोन महत्त्वपूर्ण फीचर येणार

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप येणाऱ्या काळात काही  महत्त्वपूर्ण फीचर लाँच करणार आहे. या फीचरची प्रतिक्षा चाहत्यांना दीर्घकाळापासून आहे. यात 'Self-destructing messages' आणि 'Dark mode' या दोन महत्त्वपूर्ण फीचरचा समावेश आहे. सध्या कंपनी या दोन्ही फीचरवर काम करत आहे. 

Self-destructing messages
 या फीचरमुळे एका ठराविक कालावधिनंतर मेसेज चॅट बॉक्समधून कोणताही मागमूस न राहता नष्ट होणार आहेत. युजर्स ठराविक कालावधी निवडू शकतो. हा कालावधी निवडल्यानंतर त्या वेळात तुम्ही पाठवलेले मेसेज आपसुक डीलीट होणार आहेत. यापूर्वी अनावधानानं पाठवलेले मेसेज डिलीट करण्यासाठी Delete for Everyone हे फीचर होतं. मात्र या पर्यायाचा वापर केल्यानंतर तुम्ही केलेले मेसेज तर डीलीट व्हायचा मात्र त्याचा पुरावा मागे राहायचा. मात्र  हे फीचर याहून वेगळं आहे. 

इन्स्टाग्राम आपलं एक फीचर करणार रद्द

Dark mode
गेल्या कित्येक महिन्यांपासून व्हॉट्स अ‍ॅप डार्क मोड फीचर आणणार अशी चर्चा आहे. अद्यापही कंपनी या फीचरवर काम करत आहे. रात्रीच्या वेळी व्हॉट्स अ‍ॅप वापरणाऱ्यांच्या डोळ्याला फोनमधील ब्राइटनेसमुळे त्रास होऊ नये याकरता हे फीचर उपयोगी असणार आहे.