पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBI ची एसएमएस अ‍ॅलर्ट सेवा कशी सुरू करायची?

स्टेट बँक ऑफ इंडिया

ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सुरू झाल्यापासून अनेकांना या विश्वातील चोरट्यांकडून गंडा घातला गेल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन बँकिंग करताना काळजी घेणे आवश्यक असते. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून खात्यातील व्यवहारांबद्दल संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठवून सावध केले जाते. अनेक ग्राहक ही सेवा वापरत आहेत. पण त्याचवेळी काही ग्राहकांना अशी काही सेवा आहे, हेच माहिती नाही. आता ही सेवा घरबसल्याही सुरू करता येते. या माध्यमातून तुम्हाला तुमच्या बँक खात्यातील उलाढालींची माहिती मिळतेच. पण त्याचबरोबर तुमच्या खात्यात काही गैरव्यवहार होत नाही ना, याचीही माहिती मिळते.

तात्काळ गृहकर्जे खरंच तात्काळ मिळतात का?

एसएमएस अ‍ॅलर्ट सुरू करण्यासाठी काय करायचे?
१. एसएमएस अ‍ॅलर्ट सेवा सुरू करण्यासाठी खातेदाराला स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग साईटवर लॉग इन करावे लागते
२. ई सर्व्हिस टॅबवर क्लिक करून नंतर एसएमएस अ‍ॅलर्टवर क्लिक करावे लागते
३. यानंतर ग्राहकाला एसएमएस अ‍ॅलर्ट पेजवर नेले जाते. इथे बँकेंसंदर्भातील अधिक माहिती द्यावी लागते. ज्या खात्यासंदर्भातील अ‍ॅलर्ट हवा आहे, ते खातेही निवडावे लागते
४. पुढील पेजवर सेवांना होकारार्थी उत्तर द्यावे लागेल. यानंतर तुमची सेवा सुरू केली जाईल.

एक मेपासून स्टेट बँकेचे नवे नियम, ग्राहकांना फायदा

एसएमएस सेवा सुरू केल्यावर तुमच्या खात्यातून पैसे काढल्यावर किंवा पैसे जमा झाल्यावर लगेचच तुम्हाला अ‍ॅलर्ट पाठवला जातो. जर तुमच्या खात्यामध्ये काही अनोळखी व्यवहार झाला असेल, तर तुम्ही लगचेच बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून तो व्यवहार थांबविण्याची मागणी करू शकता किंवा पुढचे व्यवहार रोखू शकता.