पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करिना कपूरची ही खास जीन्स सध्या ट्रेंडमध्ये!

करिना कपूर

अभिनेत्री करिना कपूर तिचा मुलगा तैमूरच्या निमित्ताने कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. काही जणांकडून तैमूरला सातत्याने ट्रोल केले जाते. त्यामुळे करिना कपूर आणि सैफ अली खान चर्चेत येतात. पण यावेळी स्थिती वेगळी आहे. यावेळी करिना कपूर तिच्या हटके जीन्समुळे चर्चेत आली आहे. यी जीन्समधील तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Raw Hem Wide Leg High Waist जीन्स सध्या चर्चेत आहेत. मुंबईच्या एअरपोर्टवरील या जीन्समधील करिनाचा फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे. निळ्या रंगाच्या जीन्सवर पिंक रंगाच्या शर्टमधील करिना एकदम कूल दिसते आहे. वन पीस असू दे नाहीतर स्टायलिश आऊटफिट करिना कोणत्याही ड्रेसमध्ये एकदम छान दिसते, असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. 

Raw Hem Wide Leg High Waist जीन्सची किंमत फार नाही. १५०० ते २००० मध्ये ती खरेदी करता येऊ शकते. ही जीन्स घालून तुम्ही पार्टीमध्ये, ऑफिसला, एखाद्या पर्यटनस्थळी कुठेही जाऊ शकता. ऍमेझॉनवरही ही जीन्स उपलब्ध आहे. कोणत्याही वयोगटातील महिला ही जीन्स घालू शकतात. या जीन्समुळे तुमचा लूक एकदम खुलून दिसेल, यात शंका नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤❤❤❤

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on