पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करिनाच्या हँडबॅगची किंमत ऐकून तुम्हीही जाल चक्रावून

करिना कपूर खान

 अभिनेत्री करिना कपूर खान ही बॉलिवूडची 'स्टाइल आयकॉन' आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे करिनाला महागड्या बॅगची आवड आहे. एका जगप्रसिद्ध महागड्या ब्रँडची बॅग कॅरी करताना नुकतंच करिनाला पुन्हा एकदा पाहण्यात आलं. या बॅगची किंमत जवळपास १३ लाख असल्याचं म्हटलं जात आहे. 

करिनाकडे अनेक आलिशान ब्रँडच्या महागड्या बॅग्स आहेत. ज्यात हर्मिस, गुची, शिनेल असा अनेक ब्रँडचा समावेश आहे. या प्रत्येक बॅग्सच्या किंमती या ८ ते १४ लाखांच्या आसपास  असल्याचं म्हटलं जात आहे. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत, फॅशन इंडस्ट्री ते बिझनेस सेक्टरपर्यंत अनेक महिला सेलिब्रिटींची पसंती ही हर्मिसच्या महागड्या बॅग्सना असते. या बॅग कॅरी करणं स्टेटस सिम्बल मानलं जातं. 

सिद्धार्थ जाधवचा साधा पण प्रभावी लूक पाहिलात का?

हर्मिस बॅग्स  या हातानं तयार केल्या जातात. लेदरपासून या बॅग्स तयार केल्या जातात. या बॅग्स तयार करण्यासाठी कोणतं लेदर वापरलं आहे यावरून या बॅग्सची  किंमत ठरते.  विशेष म्हणजे या बॅग्सनां सेकेंड हँड मार्केटमध्येही मोठी मागणी आहे. या बॅग्स वापरून झाल्यानंतर पुन्हा विकल्या जातात, वापरातल्या बॅग्सना मिळणारी किंमतही  लाखोंच्या घरात आहेत. 

या बॅग्स कोणत्याही सेलिब्रिटींना सहज उपलब्ध होत नाही हेही तितकंच खरं. एक हर्मिस बॅग मिळवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी कित्येक वर्षे वेटिंगवर असतात. ही वेटिंग लिस्ट ५ ते ७ वर्षांची असते, यावरून या बॅग्सची लोकप्रियता लक्षात आलीच असेल. 

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा