पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३९ व्या वर्षीही करिनाच्या सुंदरतेचे आणि फिटनेसचे 'हे' आहे रहस्य

करिना कपूर

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. पतौडी हाऊसमध्ये कुटुंबियांसोबत करिना कपूरने वाढदिवस साजरा केला.   ऐवढ्या वयात देखील करिना अजूनही फिट आहे. करिना कपूर बॉलिवूडमधील खूप सुंदर आणि फिट अभिनेत्रींमध्ये एक आहे. करिनाच्या वाढदिवसानिमित्त ती स्वत:ला कशापध्दतीने फिट ठेवते हे जाणून घेऊया. 

'महाराष्ट्रानं मला भरभरून दिलं, आता कोणतीही इच्छा नाही'

सकारात्मक विचार - 
अभिनेत्री करिना कपूरचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यक्तीने फिट राहण्यासाठी सर्वात आधी जीवनाकडे स्वस्थ दृष्टीकोनाने पाहिले पाहिजे. सतारात्मक विचार, संतुलित आहार आणि योग्य व्यायामामुळेच करिनाला फिट राहण्यास मदत होते. 

साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

पॉवर योगा आणि हॉट योगा - 
करिना कपूर झिरो फिगर कायम ठेवण्यासाठी दररोज पॉवर योगा आणि हॉट योगा करते. करिनाला 'पिलाटे' नावाचा नवीन व्यायाम प्रकार करायला खूप आवडते. वजन कमी करण्यासाठी, शरिरात लवचिकता आणण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी हा सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. करिना कपूर आठवड्यात दोन ते तीन दिवस पिलाटे व्यायाम करते. याशिवाय फिट राहण्यासाठी करिना रोज वॉर्म अप, सूर्य नमस्कार, अष्टांग योग, नौकासन, भुजंगासन, वीरभद्रासन हे योग प्रकार करते. 

KBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल

व्यायामासोबत शाकाहारी जेवण -
करिनाचे असे म्हणणे आहे की, व्यायामासोबतच शाकाहारी आहार हे फिटनेस कायम ठेवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. जे तिच्या फिटनेस आणि सुंदरतेचे खास रहस्य आहे. ती सांगते की, खाण्या-पिण्याच्या बाबतीत ती पूर्ण भारतीय आहे. तिला जेवणात तूप-चपाती आणि वरण-भात खूप आवडतो. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करिना कधीच उपाशी राहत नाही. तर पोटभरुन जेवण करते आणि आनंदी राहते. त्यामुळे तिचे शरिर चांगले काम करते आणि फिट सुध्दा राहते. 

करिनाने पतौडी हाऊसमध्ये कुटुंबियांसोबत 'असा' साजरा केला वाढदिवस