पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बालकलाकाराच्या पर्समध्ये दडलंय तरी काय? वाचून तुम्हालाही येईल हसू

बालकलाकाराच्या पर्समध्ये दडलंय तरी काय?

'माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेला हा सर्वोत्तम अभिनय होता' असं  आपल्यापेक्षा वयानं तिप्पट असणाऱ्या नायकाला कानाजवळ जाऊन सांगणाऱ्या लहान मुलीनं साधरण नऊ- एक महिन्यांपूर्वी सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा तो सहजपणा सर्वांना भावला. ही लहान अभिनेत्री म्हणजे ज्युलिया बटर्स होय. डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या ९२ व्या ऑस्कर पुरस्काराठी ती उपस्थित होती. ज्युलियानं 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड' चित्रपटात लहान भूमिका साकारली आहे. 

Oscars 2020 : ७१ लाखांच्या गुडी बॅगमध्ये दडलंय तरी काय?

या चित्रपटाला ऑस्करमध्ये दहा नामांकनं मिळाली होती. गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दहा वर्षांची ज्युलिया रेड कार्पेटवर अवतरली. आपल्या ड्रेसला साजेशी गुलाबी  रंगाची पर्स लहानग्या ज्युलियाच्या हातात होती. तिच्या हातात असणाऱ्या पर्समध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांना होतं. आश्चर्य म्हणजे इतर अभिनेत्रींप्रमाणे सौंदर्यप्रसाधनं  न ठेवता लहानग्या ज्युलियाच्या पर्समध्ये एक टर्की सँडविच होतं.

कोरोनामुळे आलिशान ब्रँडला असा बसला फटका

 ऑस्कर सोहळ्यात असलेलं जेवण मला आवडत नाही, त्यामुळे उपाशी रहावं लागू नये यासाठी  मी पर्समधून सँडविच पॅक करून आणलं, असं निरागस ज्युलियानं माध्यमांना सांगितलं.