पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचा 'जसा देश तसा वेश'

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका नुकतीच भारत दौऱ्यावर येऊन गेली. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान इवांकानं 'जसा देश तसा वेश' ला प्राधान्य दिलं. राष्ट्रपती भवनातील पहिल्या भेटीसाठी तिनं  शेरवानी परिधान केली होती. 

ट्रम्पच्या मुलीची २० वर्षे जुन्या स्टाइलला पसंती

तर संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमासाठी ती अनारकली ड्रेस परिधान करून आली होती. संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तिनं  प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल  यानं डिझाइन केलेला अनारकली निवडला होता. या अनारकलीवर हातामागावर विणलेली फुलांची नाजूक नक्षी होती. इवांकाचा हा वेश देखील सर्वांना आवडला.

इवांकानं दिल्ली भेटीतील कार्यक्रमात भारतीय फॅशन डिझाइनला पसंती देत त्याप्रमाणे वेशभूषा करण्याचा प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्न सर्वांना आवडला. इवांका ही दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आली होती. 

रेड कार्पेटवरचं 'फुलपाखरु' !