पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्पच्या मुलीची २० वर्षे जुन्या स्टाइलला पसंती

ट्रम्पच्या मुलीची २० वर्षे जुन्या स्टाइलला पसंती

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि मुलगी  इवांकासोबत भारत दौऱ्यावर आले. आज सकाळी ट्रम्प कुटुंबीयांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रम्प यांची मुलगी आणि व्हाइट हाऊसची सल्लागार इवांकानं आपल्या 'देसी स्टाइल'नं अनेकांचं लक्ष वेधलं.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे जाणून घ्या

इवांकानं प्रसिद्ध भारतीय डिझायनर अनिता डोंगरे यांच्या फॅशन कलेक्शनमधली पांढरी शेरवानी परिधान केली होती. त्यावर असलेले पारंपरिक सोन्याचे  इअररिंगही इवांकाचे सौंदर्य खुलवत होते. ''इवांकानं पश्चिम बंगालमधील मुरशीदाबादमधल्या रेशमी धाग्यापासून विणलेली शेरवानी परिधान केली होती. ही स्टाइल खरंतर २० वर्षे जुनी आहे, मात्र ती इतके वर्षे उलटल्यानंतरही आजच्या काळातली वाटते. याच पॅटर्नमध्ये शुभ्र रंगाबरोबरच निळ्या आणि काळ्या रंगातली शेरवानी माझी सर्वात आवडती आहे'', असं फॅशन डिझायनर अनिता डोंगरे म्हणाल्या. 

इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक !

यापूर्वी डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन , हिलेरी  क्लिंटन आणि अनेक नावाजलेल्या स्त्रियांनी भारतभेटीच्या वेळी अनिता डोंगरे यांच्या फॅशन कलेक्शनला  पसंती दिली आहे.