पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परवडणाऱ्या दरातील आयफोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता

आयफोन

अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षीत असा आयफोन ९ म्हणजेच iPhone SE 2 कदाचित पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून परवडणाऱ्या दरातील आयफोनची चर्चा आहे. हा आयफोन मार्च अखेरीस लाँच होणार होता मात्र कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती पाहता या फोनचं लाँचिग पुढे ढकलण्यात आलं. मात्र आता हा फोन पुढील आठवड्यात लाँच होईल अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

अफवांचे मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपची नवी योजना

iPhone SE 2 मध्ये ४.७ इंचाचा डिस्प्ले आहे  तर ३ जीबी रॅम आणि २५६ जीबी एनबिल्ड स्टोअरेज असण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात बाहेर आलेल्या काही टेक रिपोर्टनुसार या आयफोनची किंमत २८ हजारांहून अधिक असेल असा अंदाज आहे. अ‍ॅपल फोन अ‍ॅनॅलिस्ट मिंग ची कुनं हा अंदाज वर्तवला आहे. 

लॉकडाऊनचा वाहतुकीवर कसा परिणाम झाला, वाचा गुगलची निरीक्षणे

अ‍ॅपल आयफोन हे सर्वसामान्य ग्राहकांच्या  खिशाला न परवडणारे आहेत. एका ठराविक वर्गाला केंद्रीत करून आतापर्यंत अ‍ॅपलनं आयफोन तयार केले आहेत. जगभरातील हा वर्ग मोठा आहे. मात्र आता कंपनी सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा दरात आयफोन लाँच करण्याच्या विचारात आहे.