पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आयफोन ११' पासून ते बरंच काही, १० सप्टेंबरला अ‍ॅपलची खास भेट

अ‍ॅपल

 सप्टेंबर महिना हा अ‍ॅपल कंपनीच्या ग्राहकांसाठी खूपच खास असतो. कारण या महिन्यात सालाबादप्रमाणे कंपनी आपले नवे फोन्स, गॅझेट लाँच करते. स्मार्टफोनमधली एक अग्रगण्य  आणि लोकप्रिय कंपनी म्हणून अ‍ॅपल ओळखली जाते. तेव्हा कंपनी १० सप्टेंबरला  होणाऱ्या लाँचिंग सोहळ्यात काय वेगळं आणणार याची उत्सुकता तमाम अ‍ॅपलप्रेमींना आहे.  

रिअलमी XT १३ सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार 

 कंपनी  आपले तीन स्मार्टफोन इव्हेंटमध्ये लाँच करणार आहे. यात iPhone 11 सीरिजमधल्या तीन  फोनचा समावेश आहे. या फोनमधली सर्वात चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल होय. नव्यानं लाँच होणाऱ्या  iPhone  11 मध्ये तीन रिअर कॅमेरा असणार आहेत, पहिल्यांदाच आयफोनचं कॅमेरा मॉड्यूल वेगळ्या रुपात पहायला मिळणार आहे. 

भारतात पाच वर्षांत शाओमीच्या १० कोटी हँडसेटची विक्री

कमी प्रकाशात चांगले फोटो, तसेच उत्तम व्हिडीओसाठी कंपनी वर्षभर मेहनत घेत आहे, आता या बदलांनी परिपूर्ण असा iPhone  11  असणार आहे. या फोनमध्ये काय वेगळे फीचर असणार आहेत यावरून १० सप्टेंबर रोजी पडदा उठणार आहे.  iPhone  11  बरोबरच कंपनी  दोन अॅपल वॉचदेखील लाँच करणार आहे.