पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

International Yoga Day : नियमित योग करा, आरोग्याच्या या समस्या दूर पळवा

योगासनं

योगविद्या हा भारताचा पुरातन ठेवा आहे. नियमित योग केल्यानं आरोग्याच्या  अनेक समस्या दूर पळतात. माणूस उत्साही आणि  सुदृढ होतो. याव्यतिरिक्त योगासनांचे शरीरास खूप फायदे आहेत. योगविद्येचा प्रसार व्हावा, योगविद्या आत्मसात करून प्रत्येकानं  निरोगी  आरोग्यशैली अंगीकारावी यासाठी  आंतरराष्ट्रीय योग दिनातून जनजागृती करण्यात येते. २०१५ पासून जगात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जात आहे. 

योगविद्येचा प्रसार केवळ भारता पुरता मर्यादित न राहता कोट्यवधी परदेशी नागरिकांनी योगविद्या आत्मसात करून निरोगी आरोग्यशैली स्वीकारली आहे. चला तर आज आपण योगविद्येचे शरीरास होणारे काही  फायदे जाणून घेणार आहोत. 

International Yoga Day 2019 : योगदिन २१ जूनला का साजरा केला जातो?

जर तुम्हाला स्थूलतेचा त्रास आहे तर योगासनं नक्की करावी  शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी योगासनं करावी. 
सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या प्रकारांनी वजन कमी होते. 
सूर्यनमस्कारासारख्या योगासनामुळे  अवयवांना रक्तपुरवठा होतो आणि हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.
त्याचप्रमाणे  योगविद्येमुळे तुम्ही ताणतणाव पूर्णपणे दूर करू शकता.  बदलत्या जीवनशैलीमुळे आपण नैराश्येत जातो, ताणावामुळे मन चिंताग्रस्त होतो अशावेळी योग विद्या ही तणाव दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. 

नियमित योगासनं  केल्यानं पोटावरील चरबी कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. 
मान, पाठीचे आजार योगासनांमुळे दूर पळतात. 
रोज योग केल्यामुळे शरिराची लवचिकताही वाढते. 
योगमुळे मनाला  शांती मिळते त्यामुळे सकाळी वेळात वेळ काढून किमान १५ ते २० मिनिटे योग करावा. 
योगासनं केल्यामुळे थकावा कुठच्या कुठे पळून जातो याउलट शरीरातील उर्जा वाढते.