पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

International Mens Day : या कारणामुळे पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतंय

जागतिक पुरुष दिन

जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण,  हिंसा रोखणं, त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करणं आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक पुरुष दिनची संकल्पना ही ' मेकिंग अ डिफरन्स फॉर मेन अँड बॉयज' ही आहे. 

..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून

अनेकदा पुरुषांच्या समस्यांवर  चर्चा होत नाही. अनेक तरुण आणि पुरुष तणावात असताना आत्महत्येचा अंतिम पर्याय स्वीकारतात. जागतिक आरोग्य संघटनेनं  जाहीर केलेल्या २०१६ च्या अहवालानुसार भारतात दर दहा हजार पुरुषांमध्ये २५८० पुरुष हे आत्महत्या करतात. भारतात पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे २५.८% आहे. यात १५ ते २९ वर्षांच्या मुलांचा आणि पुरुषांचा समावेश आहे. तर  महिलांचे आत्महत्या करण्याचे  प्रमाण हे १६.४ % आहे. 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी

पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर काम करणारी संस्था सीएएलएमच्या अहवालानुसार बेरोजगारी वाढली की पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढतं. बेरोजगारीच्या दरात १ टक्क्यांनी जरी वाढ झाली तरी आत्महत्येचं प्रमाण हे ०.७९% नी वाढतं.