पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून

प्रातिनिधिक छायाचित्र

इन्स्टाग्राम हे  सर्वाधिक वापरलं जाणारं फोटो शेअरिंग अ‍ॅप आहे. त्याचबरोबर जाहिरातींसाठी, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, व्यवसायासाठी या अ‍ॅपचा वापर जगभरातील युजर्सकडून वाढला आहे. मे महिन्यात इन्स्टाग्रामनं युजर्सच्या अकाऊंटवरून  ‘likes’ आकडा काढण्याचा विचार बोलून दाखवला होता. इन्स्टाग्रामनं हे फीचर काढून टाकण्यासाठी चाचणी करायला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्राम भारतातही ही चाचणी करत आहे. त्यामुळे आता इन्स्टाग्रामच्या भारतीय युजर्सनां त्यांच्या पोस्टला एकूण किती ‘likes’ आहेत याचा आकडा दिसणार नाही. 

एँड्राईड मोबाईलसाठी व्हॉट्सऍपकडून लवकरच ही नवी सुविधा

 ‘likes’ लिस्टवर क्लिक केल्यास केवळ युजर्सनां कोणी आणि किती जणांनी पोस्ट  ‘likes’ केली याची यादी दिसणार आहे. मात्र इतर  युजर्स ती यादी पाहू शकत नाही. सर्वप्रथम ‘likes’चं फीचर हटवण्याची चाचणी कॅनडामध्ये मे  २०१९मध्ये सुरू झाली.  त्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, ब्राझील, आयर्लंड, इटलीमध्ये जुलै महिन्यात ही चाचणी करण्यात आली. सर्व देशांतून याला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आता इथेही हा प्रयोग इन्स्टाग्राम राबवत आहे.

व्हॉट्स अ‍ॅपमुळे मोबाइलची बॅटरी उतरते, स्मार्टफोन धारकांची तक्रार

फोटो आणि व्हिडिओला मिळणाऱ्या ‘likes’ चा आकडा पाहून अनेकदा युजर्स मत तयार करतात. ‘likes’चा हा आकडा त्यांच्या निर्णय क्षमतेवरही परिणाम करू  शकतो  म्हणूनच कंपनीनं  ‘likes’ चा एकूण आकडाच अ‍ॅपवरून अदृश्य करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम  हे फोटोशेअरिंग अ‍ॅप आहे, इथे लाखो  फोटो दरदिवशी अपलोड होत असतात या कलेची सुंदरता पाहण्यापेक्षा, ती अनुभवण्यापेक्षा केवळ  ‘likes’ वर लोक मत तयार करतात. अनेकांसाठी कलाकृतीपेक्षाही ‘likes’चा  आकडा महत्त्वाचा असतो  हे चुकीचं आहे असं कंपनीला वाटतं म्हणूनच कंपनीनं इन्स्टाग्रामवरून ‘likes’ चा आकडा पूर्णपणे काढून टाकण्याचा विचार करत आहे.