पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्रामवर त्रास देणाऱ्यांवर आता नवा उपाय

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अ‍ॅप जगभरात लोकप्रिय होत चाललं आहे. मात्र या अ‍ॅपवर फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांना अश्लील, नकारात्मक प्रतिक्रिया, सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. यावर कंपनीनं उपाय  शोधून काढला आहे.

सर्वात महागड्या 'Galaxy Fold' च्या हजारो हँडसेटची ३० मिनिटांत विक्री

इन्स्टाग्रामचं 'Restrict' हे फीचर आता जगभरातील इन्स्टाग्राम युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. या फीचरमुळे अश्लिल शेरेबाजी  करणाऱ्यांना किंवा मनस्ताप देणाऱ्या पोस्टमध्ये तुम्हाला टॅग करणाऱ्या युजर्सवर बंदी घालता येणार आहे.

डीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही

त्याचबरोबर तुमच्या पोस्टवर येणाऱ्या प्रतिक्रिया या जाहीर करायच्या की  डीलिट करायच्या ते देखील तुम्हाला  ठरवता येणार आहे. ज्या त्रासदायक अकाऊंटवर तुम्ही बंदी घातली आहे त्यांच्या प्रतिक्रीया तुमच्या पोस्टवर दिसणार नाही. याव्यतिरिक्त असे अकाऊंट धारक थेट तुमच्याशी संपर्क साधू शकत नाही.