पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्राम आपलं एक फीचर करणार रद्द

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फोटो फीचर अ‍ॅपनं काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे अ‍ॅप येत्या काही दिवसांत आपलं ‘Following’ हे फीचर काढून टाकणार आहे. या फीचरचा युजर्सकडून वापर होत नसल्यानं ते काढून टाकण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. 

इन्स्टाग्रामवर त्रास देणाऱ्यांवर आता नवा उपाय

‘Following’ या फीचरमध्ये युजर्सनां त्यांच्या फॉलोअर्सच्या अपडेट्स कळायच्या. तुम्ही फॉलो करणाऱ्या युजर्सनं कोणते नवे मित्र जोडले, कोणाच्या फोटोला लाईक्स केलं याची माहिती ‘Following’ मध्ये दिसायची. मात्र अनेकांना हे फीचर असल्याचं ठावूक नव्हतं, असं कंपनीच्या निदर्शनास आलं. या फीचर्सचा वापर युजर्सकडून फारसा केला जात नाही मात्र काहीजण संपर्कातल्या मित्रांवर नजर ठेवण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं या फीचरचा वापर करतात अशीही बाब  इन्स्टाग्रामच्या नजरेस आली. त्यामुळे हे फीचर कंपनी काही दिवसांत काढून  टाकणार आहे अशी माहिती कंपनीच्या प्रोडक्ट हेडनं बझ फिडशी बोलताना दिली. 

डीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही

एकीकडे कंपनीनं हे फीचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे  कंपनी काही नवीन फीचरही आणणार आहे यात 'डार्क मोड'चाही समावेश आहे.