पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्राममुळे सर्वाधिक मोबाइल डेटा खर्च होतोय? अशाप्रकारे वाचवा तुमचा डेटा

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम हे सर्वाधिक वापरले जाणारे फोटो शेअरिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा वापर केवळ फोटोशेअरिंगपुरता न राहता आता या अ‍ॅपचा वापर व्यावसायिक कारणांसाठी देखील होत आहे. मात्र इन्स्टाग्राम वापरताना युजर्सचा मोबाइल डेटा हा सर्वाधिक खर्च होत असल्याचं समोर आलं आहे. तेव्हा हा मोबाइल डेटा कमीत कमी कसा खर्च होईल यासाठी इन्स्टाग्रामनं 'डेटा सेव्हर फीचर' लाँच केलं आहे. या फीचरमुळे इन्स्टाग्राम युजर्सनां त्यांचा मोबाइल डेटा वाचवता येणार आहे. 

इन्स्टाग्राम सुरू केल्यानंतर अनेकदा हाय रेझ्योल्यूशनचे फोटो आणि  व्हिडिओ लोड  होतात. यामुळे मोबाइल डेटा  अधिक खर्च होतो. मात्र 'डेटा सेव्हर फीचर' मुळे  हाय रेझ्योल्यूशनचे फोटो आणि व्हिडिओ युजर्सच्या परवानगीविना लोड होणार नाही. यामुळे युजर्सचा डेटा वाचणार आहे. 

कसं सुरू करायचं 'डेटा सेव्हर फीचर' 
- ‘Settings’  मेन्यूमध्ये जाऊन ‘Account’वर क्लिक करा.
- यातील ‘Cellular Data Use’  या पर्यायावर क्लिक करा
- ‘Cellular Data Use’  वर क्लिक केल्यानंतर ‘Never’, ‘Wi-Fi Only,’ आणि ‘Cellular + Wi-Fi’ असे पर्याय तुम्हाला दिसतील.
यापैकी एक सिलेक्ट करून तुम्ही मोबाइल डेटाची बचत करू शकता. हे फीचर फक्त अँड्राईड युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.