पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Beat Air Pollution : घराबाहेरच नाही तर घरातही आहे प्रदूषण

प्रदूषण

जगभरात ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण  दिन' म्हणून साजरा केला जात आहे. २०१९ मधील जागतिक पर्यावरण  दिनाची संकल्पना ही वायू प्रदूषणावर आधारित आहे. भारतातल्या अनेक शहरांची गणना ही प्रदूषित शहरांच्या यादीत केली जात आहे, हे अनेकांना ठावूक आहे. घराबाहेर पडल्यानंतर आपण प्रदूषित वातावरणात श्वास घेत आहोत याची जाणीव पावलोपावली होत आहे. 

बाहेरील प्रदूषणाचा दृष्परिणाम आपल्या तब्येतीवर होत आहे मात्र दुसरीकडे आपल्या घरातही आपण सुरक्षित नाही ही बाब अनेकांना ठावूकच नाही. घरातील काही गोष्टी आणि सवयीमुळे तुमचं घरंही प्रदूषित होऊ शकतं त्यामुळे वेळीच काळजी घेतलेली बरी.

धूम्रपान करणं टाळा
अनेकजण घरातच धूम्रपान करतात. यामुळे आपण स्वत:चा नाही तर घरातील इतर मंडळींचा जीवही धोक्यात घालत असतो हि बाब अनेकांना समजत नाही.  यामुळे घरात धूम्रपान करणं टाळा.

रुम फ्रेशनर, उदबत्ती, कॉईल
अनेक जण घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी रुम फ्रेशनरचा वापर करतात. रुम फ्रेशनरमध्ये असलेले केमिकल्स हे आणखी प्रदूषण वाढवतात. 
तर दुसरीकडे सुंगधी उदबत्त्यांमध्ये घातक अशा रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे त्यातून निघणाऱ्या धुरामुळे हे रासायनिक घटक श्वासावाटे शरीरात जातात. 
कॉईल्समुळे देखील घरात सर्वाधिक प्रदूषण होतं. माश्या आणि इतर किटकांना दूर ठेवण्यासाठी कॉईल्स पेटवल्या जातात मात्र या कॉईल्स तुमच्या शरीरासही तितक्याच हानिकारक असतात. या तिन्ही गोष्टींच्या अतिवापरामुळे घरातील हवा अधिक दूषित होते असं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे या गोष्टींचा अतिवापर करताना विचार करा. 

हवेतून प्रदूषकं थेट घरात
बरेचदा, खिडकी दरवाज्यातून धूळ, धूलीकण घरात येतात. या धूलीकणात शरीरास घातक असा प्रदूषकांचा समावेश असतो जे श्वासावाटे  थेट शरीरात जातात. त्यामुळे घरात येणारी धूळ वेळीच साफ करा.