पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगातील पहिले पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शन तयार, वाचा उपयुक्तता काय...

प्रातिनिधिक छायाचित्र

जगातील पहिल्यावहिल्या पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनच्या वैद्यकीय चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) यशस्वी झाल्या आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (इंडिनय कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) यशस्वीपणे या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता हे इंजेक्शन परवानगीसाठी भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकल्पातील संशोधकांनी ही माहिती 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिली. 

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? शक्य की अशक्य...

पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनचा प्रभाव ते घेतल्यानंतर १३ वर्षांसाठी कायम राहतो. नंतर या इंजेक्शनचा प्रभाव ओसरतो. हे इंजेक्शन वापरात आल्यावर पुरुषांना नसबंदी शस्त्रक्रिया करावी लागणार नाही. सध्या पुरुषांसाठी नसबंदी शस्त्रक्रिया हे एकमेव गर्भनिरोधक जगात उपलब्ध आहे. ही छोटी शस्त्रक्रिया असून, ती केल्यावर पुरुषांना इतर गर्भनिरोधक वापरण्याची गरज नसते.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर एस शर्मा म्हणाले, हे इंजेक्शन वापरण्यासाठी तयार आहे. फक्त त्याला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मंजुरी मिळणे बाकी आहे. चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या इंजेक्शनच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी एकूण ३०३ जणांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या सर्वांवर याची चाचणी घेण्यात आली. ९७.०३ टक्के इतका या इंजेक्शनचा यशस्वी निर्देशांक आहे. त्याचबरोबर या इंजेक्शनचे कोणतेही साईड इफेक्टस दिसलेले नाहीत. जगातील पहिले पुरुष गर्भनिरोधक म्हणूनही हे उत्पादन ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोणत्याही नव्या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषद ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेला केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून निधी दिला जातो.

मोबाइल यूजर्सला मोठा झटका, डिसेंबरपासून बोलणं महाग होणार

भारतात ५३.५ टक्के दाम्पत्यांकडून गर्भनिरोधकांचा वापर केला जातो, अशी माहिती २०१५-१६ मधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात देण्यात आली आहे. यापैकी ३६ टक्के महिला कायमस्वरुपी गर्भनिरोधक शस्त्रक्रिया करतात तर केवळ ०.३ टक्के पुरुष नसबंदी करून घेतात, असे या अहवालात म्हटले आहे.