पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक चमचा शुद्ध तूप, श्रिया पिळगांवकरचा फिटनेस फंडा

श्रिया पिळगांवकर

सेलिब्रिटी फिट राहण्यासाठी नेमकं काय करतात? त्यांच्या आहारात प्रामुख्यानं काय असतं? त्यांच्या निरोगी आरोग्याचं, सुंदर त्वचेचे रहस्य काय? या सारख्या अनेक प्रश्नांचं  कुतूहल सामान्यांना असतं. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेल्या अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. 

चहा- कॉफी प्या आणि मग कपही खा, कंपनीचे 'Edible Cups'

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मी एक चमचा शुद्ध तूप खाते. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि तूप हे त्वचेसाठीही फायदेशीर असतं. त्यानंतर कोमट पाणी  आणि मुठभर भिजवलेले बदाम मी खाते असं श्रियानं सांगितलं. 

सकाळच्या न्याहरीत अंडी, पोहे, फळ यांचा समावेश असतो तर जेवणात प्रामुख्यानं मासे, डाळ, भाज्या चपाती किंवा भाकरी खाते असा डाएट प्लान तिनं सांगितला. तंदूरुस्त राहण्यासाठी रोज योगसाधना करते. चित्रीकरणातून विश्रांती असेल तेव्हा आठवड्यातील पाच दिवस व्यायाम करते आणि चालण्यावर जास्त भर देते असंही तिनं सांगितलं. 

मधुमेहच्या रुग्णांनी ही फळे जपून खा

सुप्रिया सचिनची मुलगी असलेल्या  श्रियानं मराठी चित्रपट 'एकूलती एक'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.