पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चहा- कॉफी प्या आणि मग कपही खा, कंपनीचे 'Edible Cups'

एडिबल कप

प्लास्टिकच्या कप्सनां पर्याय म्हणून बाजारात चहा- कॉफीसाठी मातीचे कुल्लड आणि कागदांच्या कप्सचा पर्याय उपलब्ध आहेत. वाढतं प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा वस्तूंचा वापर वाढला  आहे. हैदराबादमधल्या एका खासगी कंपनीनं प्लास्टिक आणि कागदांच्या कप्सनां पर्याय म्हणून खाऊ शकणारे एडिबल कप आणले आहेत. 

कॉफीपासून तयार करणार सनग्लासेस

हे कप्स धान्यापासून तयार केले आहेत. यातून थंड आणि गरम अशा दोन्ही प्रकारची पेय देता येतील असं कंपनीनं म्हटलं आहे. प्लास्टिक आणि कागदांच्या कप्सना हा पुरक  पर्याय आहे. या कप्समुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचणार नाही. पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे.' अशी माहिती कंपनीचे संचालक अशोक कुमार यांनी दिली. 

मधुमेहच्या रुग्णांनी ही फळे जपून खा

या कपमधून चहा, कॉफी, दही, ताक, सरबत देता येईल. ४० मिनिटांपर्यंत कोणताही पातळ पदार्थ यात राहू शकतो. हा कप नंतर खाताही येईल. तसेच कप तयार करताना कोणत्याही प्रकारचे कृत्रिम पदार्थ वापरले नसल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.