पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुआवै कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढच्या महिन्यात होणार लाँच

हुआवै Mate X

हुआवै पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Mate X पुढील महिन्यात लाँच करणार आहे. कंपनीच्या सीईओंनी  IFA 2019 मध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

हुआवैचा फोल्डेबल स्मार्टफोन जुलै महिन्यात लाँच होणं अपेक्षित होतं. मात्र या स्मार्टफोनच्या लाँचिगची तयारी पुढे ढकलण्यात आली. या फोनच्या डिस्प्लेचा आकार हा  ८ इंचाचा असून फोल्ड केल्यानंतर  स्क्रीनचा आकार हा  ६.६ इंचाचा होतो. 

'आयफोन ११' पासून ते बरंच काही, १० सप्टेंबरला अ‍ॅपलची खास भेट

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात Mate X लाँच होणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वी अनेक चाचण्या घेण्यात आल्या. ग्राहकांना तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी या चाचण्या करण्यात आल्या. याचमुळे लाँचिंगची तारीख पुढे ढकलली असल्याचं म्हटलं आहे. 

हुआवै आधी दक्षिण कोरियातील सर्वात मोठी कंपनी सॅमसंग  ‘Galaxy Fold’ हा आपला फोन या महिन्याच्या अखेरीस बाजारात आणत आहे. त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या कोणत्या फोन्सना ग्राहकांचा अधिक प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखं ठरेन.