पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

असा पाहता येणार अ‍ॅपलच्या नव्या आयफोनचा अनावरण सोहळा

आयफोनचा अनावरण सोहळा

स्मार्टफोनमधली एक अग्रगण्य  आणि लोकप्रिय कंपनी म्हणून ओळखली जाणारी अ‍ॅपल कंपनी आज आपले नवे आयफोन, अ‍ॅपल वॉचचं अनावरण करणार आहे. भारतातील अ‍ॅपल प्रेमींनाही हा अनावरण सोहळा लाइव्ह पाहता येणार आहे. तो कसा पाहायचा हे जाणून घेऊ

कधी लाँच होणार नवे आयफोन
१० सप्टेंबरला कॅलिफोर्नियातील कंपनीच्या मुख्यालयात अ‍ॅपलच्या बहुप्रतिक्षित आयफोनचं अनावरण होणार आहे. कंपनी यावर्षी iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे तीन फोन लाँच करणार आहे. यातल्या एका आयफोनमध्ये एलसीडी पॅनल्स आणि दुसऱ्या फोनमध्ये ओएलइडी स्क्रीन्स असणार आहेत. ओलइडी स्क्रीन्स आयफोनची किंमत तुलनेनं अधिक असल्याचा अंदाज आहे. 

रिअलमी XT १३ सप्टेंबरला भारतात लॉन्च होणार

कुठे पाहता येईल आयफोन अनावरण सोहळा
भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता हा अनावरण सोहळा सुरू होणार आहे. पहिल्यांदाच  युट्यूबवर हा अनावरण सोहळा  प्रेक्षकांना लाइव्ह पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाईट्सवर गुगल क्रोम, सफारी यांसारख्या सर्च इंजिनद्वारे तो लाइव्ह  पाहता येणार आहे.