पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही? मग हे करा....

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅपचे 'ग्रुप' हे फीचर अनेकांची डोकेदुखी ठरत चालली आहे. अनेकदा युजर्सचं मत विचारात घेण्याआधी त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवरच्या विविध ग्रुप्समध्ये अ‍ॅड केलं जातं. नको असलेल्या ग्रुपमध्ये स्वत:चा नंबर अ‍ॅड होण्यापासून वाचायचं असल्यास कंपनीनं नवा पर्याय युजर्सनां उपलब्ध करून दिला आहे. 

व्हॉट्स अ‍ॅपनं आपल्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या फीचरमुळे युजर्सनां त्यांच्या मनाविरुद्ध कोणीही व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकत नाही. 

हेरगिरीचा फटका, व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८०% नी घटली

यासाठी युजर्सनां त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपमधील सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. हे बदल केल्यानंतर नको असलेल्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड होण्यापासून तुम्ही वाचू शकता. हे बदल कसे करावे ते पाहू 

- व्हॉट्स अ‍ॅप सुरु केल्यानंतर Settings या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Account वर क्लिक करा.
- Account वर क्लिक केल्यानंतर Privacy हा पर्याय दिसेल. 
- Privacy क्लिक केल्यानंतर Groups हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन तुम्ही सेटिंगमध्ये काही बदल करु शकता. 
-  Groups वर क्लिक केल्यानंतर ‘Everyone’, My Contacts’ आणि  ‘My Contacts expect’ असे पर्याय दिसतील. 
- ‘Everyone’ हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला कोणीही, कोणत्याही व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकतं. 
- 'My Contacts’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या Contacts list मधील युजर्सच तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकतील. 
- तर ‘My Contacts expect’ या पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या Contacts list मधील वगळलेले युजर्स तुम्हाला कधीही नको असलेल्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करु शकत नाही. 

गोव्यातील या प्रसिद्ध ठिकाणी फोटोसाठी भरावा लागणार ५०० रुपयांपर्यंत कर