पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मीठ किती खावे?

मीठ

शरीरात  सोडियमची मात्रा अधिक झाली तर अनेक आजार संभवतात.  मीठ किंवा खारवलेले पदार्थ हे सोडियमचे प्रमुख स्त्रोत आहेत. शरीरात मीठाचं प्रमाण  वाढलं तर ते आरोग्यास हानिकारक असतं म्हणूनच मीठाचं प्रमाणात सेवन करणं आवश्यक आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. अनेकांच्या आहारात साठवलेल्या  आणि खरवलेल्या पदार्थांचा सहभाग वाढला आहे. यात मीठाची मात्रा ही अधिक असते. म्हणूनच मिठाचा वापर हा बेतानं करावा. 

आवळा करतो मुरमाचे डाग दूर

- जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रौढांनी दिवसातून ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावं.
- शरीरालाच जितकं आवश्यक आहे त्याच प्रमाणात मीठ खावं.
- जेवण तयार करताना कमीत कमी मीठाचा वापर करावा.
-  जेवणात वरून मीठ घेणं टाळावं.

स्वामीत्व भावना गाजवणाऱ्या जोडीदारास कसं हाताळाल?

- स्नॅक्स, लोणचं, पापड, चटणी, पिझ्झा, वेफर्स, भुजीया यामध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते जास्तीत जास्त खाणं टाळावं. 
- शक्यतो न खारवलेले दाणे खावेत.
 - जेवणात फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.  भाज्या-  फळांमध्ये असलेलं पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रणात ठेवतं.