पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रदूषणापासून शरीराची काळजी घेणारे हे चार मसाले

प्रदूषणापासून वाचवणारे मसाले

दिल्लीत हवेतील प्रदूषण वाढलं आहे. या वातावरणात श्वास  घेणंही अवघड आहे. हवेचा दर्जा खालावलेला असल्यानं अस्थमा, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे. या समस्यांशी लढण्यासाठी  शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही  उत्तम असायला हवी. 

चीनची '९९६ संस्कृती' भारतातही वाढतेय

प्रदूषणापासून शरीराची होणारी हानी भरून काढायची असेल तर शरीरास अ, ब २ जीवनसत्त्व, कॉपर, मॅग्नेशिअम, जस्त यांसारखी खनिजंही आवश्यक आहेत, असा सल्ला  पोषण विशेषज्ञ डॉ. कविता देवगन यांनी दिला आहे. ही खनिजे आणि जीवनसत्त्व शरीरास  फळं, भाज्याबरोबरच मसाल्यांच्या जिन्नसांमधूनही मिळतात. 

काळी मिरी : प्रदूषण आणि सिगारेटच्या धुरापासून होणाऱ्या हानीपासून वाचायचं असेल तर आहारात काळी मिरीचा समावेश करावा. गरम पाण्यासोबत काळ्या मिरीचं सेवन केल्यानं डिहाइड्रेशनचा त्रास आणि त्यातून येणारा थकवा जाणवत नाही. 

प्रदूषणापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता हा उपाय

ओवा : प्रदूषणामुळे होणारा खोकला, गळा सुजणे यांसारख्या  त्रासावर ओव्याचा चहा हा रामबाण इलाज आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्यासाठी ज्या समस्या कारणीभूत आहेत त्याचा नाश करण्यास ओवा फायदेशीर आहे. 
हळद : हळद ही जंतूनाशक आहे. प्रदूषणामुळे अनेकांचा अस्थमाचा त्रास वाढतो अशा वेळी तूपात हळद मिसळून खाल्ल्यानं अस्थमाची समस्या दूर होते. 
लवंग : घरातून बाहेर पडताना तोंडात लवंग ठेवावी, त्याचप्रमाणे कोमट किंवा गरम पाणी प्यावे असा सल्लाही कविता यांनी दिला आहे. 

बेघरांसाठी प्रार्थना करा, दिल्ली प्रदूषणाविषयी प्रियांकाची चिंता