पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन : मुलांसोबत कसं वागावं?

संग्रहित छायाचित्र

कोरोना विषाणूपासून मुलं सुरक्षित रहावी यासाठी मुलांना घराबाहेर पाठवू नका अशा सूचना करण्यात आल्यात. मात्र हे दिवस खेळण्या- बागडण्याचे  आहेत, अशावेळी मुलांच्या चंचल मनाला घरात थांबणं  कसं शक्य आहे? बऱ्याच मुलांचे आई वडिल हे वर्किंग आहेत. लॉकडाऊनमुळे ऑफिसेस बंद असल्यानं अनेकांचे पालक घरुन काम करत आहेत. मात्र घरात मुलांच्या गोंधळामुळे काम करणं अशक्य आहे अशी तक्रार पालक करत आहेत. मात्र ही तक्रार करत असताना मुलांशी कसं वागावं याचा विचार प्रत्येक पालकांनी केला पाहिजे यासाठी काय करता येईल ते पाहू.

मुलांवर अजिबात चिडू नका. 
घरात मुलं असलं की काम करणं अशक्य आहे हे मान्य आहे मात्र काही दिवस आपण याला काहीच करु शकत नाही. शाळा, ट्यूशन, मग हॉबी क्लालेस यामध्ये आजकालची मुलं  अडकून पडली आहेत. आई- बाबा दोघंही ऑफिसमध्ये. मुलांना आई बाबा दिसतात कधी? आता सगळ्यांनाच सुट्टी. मुळात आई आणि बाबा हे दोघंही घरी आहेत याचंही त्यांना कौतुक आहे त्यामुळे तुम्ही काम करत असताना कुतूहल म्हणून ते अनेकदा तुमच्या कामात व्यत्यय आणतील मात्र अशावेळी त्यांच्यावर चिडू नका त्यांना समजावून सांगा. 

लॉकडाऊन : व्हायरल झालेली 'डालगोना कॉफी' तुम्ही ट्राय केलीत का?

वेळ द्या.
घरातही केवळ काम एके काम असं करु नका कामातून अधून मधून पाच दहा मिनिटांचा ब्रेक घ्या आणि तो वेळ मुलांसोबत घालवा.

वाचनाची गोडी लावा
पुस्तकांचा दुसरा मित्र कोणीही नाही. या सुट्ट्यांचा आणि तुमच्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करुन घ्या. मुलांना पंचतंत्र, इसापनितीच्या गोष्टी सांगा किंवा त्यांना गोष्टीची पुस्तक वाचायला द्या.

क्रिएटीव्ही गोष्टीत गुंतवा
मुलांना चित्र काढणं किंवा हस्तकलेत गुंतवा, युट्युब सोशल मीडियावर  लहान मुलांसाठी अनेक क्रिएटीव्ही गोष्टींचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते मुलांना दाखवा. दररोज मुलांना एक टास्क द्या. त्यांचं मन या गोष्टींत गुंतवा. 

कोविड १९ रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्यास ह्रदयाला धोका, नवे संशोधन

मुलांना स्वावलंबनाची सवय लावा
याकाळात  मुलांना स्वावलंबी बनवा, घरातील अनेक छोट्या कामात  त्यांची  मदत घ्या. हसत खेळत त्यांना काही गोष्टी शिकवा. आपलं जेवणाचं ताट बेसिनमध्ये ठेवणं, केर काढणं, कपड्यांची घडी करणं अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Here are 5 Tips which helps to make stronger bond with your children during corona lockdown crisis