पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Tips : घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?

संग्रहित छायाचित्र

आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करताना अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत आहेत. विशेषत: मान आणि पाठ दुखणं. ऑफिसमध्ये सिटिंग अरेंजमेंट या वेगळ्या असतात त्यामुळे तितका त्रास होत नाही, मात्र घरुन काम करताना बसण्याची जागा योग्य नसल्यानं या समस्यांना सामोरं जावं लागतं अशावेळी काय करता येईल यासाठी गोदरेज इंटेरियोतर्फे देण्यात आलेल्या ‘वर्क फ्रॉम होम’ गाइड मधल्या काही उपयोगी टिप्स पाहू.

टायपिंग करताना हातांची स्थिती काटकोन हवी
पहिल्यांदा बसण्यासाठी एक योग्य खुर्चीची निवड करा. त्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारे बसताना मदत होते. बसण्याची खुर्ची ही जास्तीत जास्त आराम देणारी हवी आणि त्यासाठी त्यात अडजस्टेबल सुविधा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाठ ताठ व सरळ राहावी यासाठीही आवश्यक त्या अडजस्टेबल सुविधा असणे गरजेचे आहे. टेबल योग्य उंचीचे असायला हवे. टायपिंग करतानाची सर्वात आदर्श स्थिती म्हणजे, हाताचे कोपर ९० अंशात असणे. यामुळे हात किंवा मान दुखत नाही.

'वृत्तपत्र, दुधाच्या पिशवीला हात लावल्याने कोरोना होत नाही'

स्क्रीनची योग्य उंची
स्क्रीनची उंची अयोग्य असल्यास मान आणि त्यासंदर्भातल्या समस्या वाढतात. कम्प्युटरचा पडदा वापरणाऱ्याच्या डोळ्यांच्या उंचीच्या समान रेषेत असायला हवा, म्हणजे त्याकडे पाहाण्यासाठी मान जास्त खाली किंवा वर करावी लागणार नाही. 

की-बोर्ड आणि स्क्रीनमधलं योग्य अंतर
 कीबोर्डवर टायपिंग करताना कम्प्युटरचा पडदा किमान एक हात दूर हवा. यासाठी दर्जेदार लॅपटॉप स्टँड, एक्स्टर्नल कीबोर्ड आणि माऊसमध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले होईल, कारण त्यामुळे कोणत्याही वेळेस काम करताना शरीरावर ताण येणार नाही.

स्मार्ट प्रॉप्स 
काम करताना थोडा वेळ सोफा किंवा बीन बॅगवर बसायला हरकत नाही, मात्र अशावेळेस लॅपटॉपखाली उशी ठेवून त्याची उंची वाढवावी तसेच पाठीला आधार म्हणून उशांचा वापर करावा. आडवे पडून काम करणे टाळा, कारण त्यामुळे पाठ व संबधित दुखण्याच्या समस्या उद्भवू शकतील.

गरम पाण्यानं आंघोळ केल्याचे हे चार फायदे

अधून-मधून फिरत राहा 
खूप वेळ काम करताना अधेमधे जागेवरून उठणे फार महत्त्वाचे आहे. बसण्याची स्थिती योग्य असली, तरी खूप वेळ एकाच जागी बसल्यास शरीर व मनावर ताण येतो. थोडा ब्रेक घ्या या ब्रेकमध्ये स्ट्रेचिंगसारखे सोपे व्यायाम करून रक्ताभिसरण सुधारता येईल.

उभे राहून काम करा 
काही वेळ उभे राहून काम केल्यास पाठीचे दुखणे कमी होते, एकाग्रता वाढते आणि जलद काम करणे शक्य होते. त्यामुळे काही प्रमाणात कॅलरीजही खर्च होतात. त्याशिवाय अधेमधे थोड्या वेळासाठी ड्रेसर, इस्त्रीचे टेबल किंवा स्टोअरेज युनिट यांचा उंच वर्कस्टेशनसारखा वापर करता येईल.

प्रकाशयोजना काळजीपूर्वक निवडा 
 तुम्ही काम करत असलेल्या खोलीत पुरेसा प्रकाश असेल याची खात्री करा. त्याचबरोबर नैसर्गिक उजेड यावा म्हणून खिडक्या उघड्या ठेवा. उजेड चमकत (ग्लेयर) असल्यास पडदे लावा किंवा योग्य अँगलमधे ब्लाइंड्स लावा. रात्रीच्या वेळेस रात्रीच्या वेळेस काम करताना टेबलावर दिवा लावा.

कोरोनाच्या हेल्पलाइनवर सामोसे मागणाऱ्याची खास 'प्रसादा'सह इच्छापूर्ती