पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सकाळचा नाश्ता आवर्जून करा

नाश्ता

सकाळी प्रत्येकाला ऑफिस, शाळा, कॉलेजमध्ये जाण्याची घाई असते.  अशा वेळी  सकाळचा नाश्ता होतच नाही. अनेकजण अत्यंत अल्प नाश्ता करून  निघतात. पण सकाळचा नाश्ता हा नेहमीच भरपेट करावा अगदी राजासारखा असं म्हणतात. सकाळचा नाश्ता हा दुपार आणि संध्याकाळच्या जेवणापेक्षाही अत्यावश्यक आहे.  मात्र काहीजण  हा नियम पाळताना दिसत नाही.

- सकाळी भरपेट नाश्ता केल्यानं  लठ्ठपणाचा धोका कमी होतो असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
-   नाश्ता केल्यानं  शरीराला अत्यावश्यक अशी कर्बोदके मिळतात  यामुळे स्मरणशक्ती सुधारते . तसेच पोट भरलेलं असल्यानं थोडा ताण कमी होतो. 
- भरपेट नाश्ता केल्यानं  भूक कमी होते यामुळे आपल्याला दुपारच्या जेवणात योग्य संतुलन राखता येतं. पोट भरलेलं असल्यानं  सतत खाण्याची सवय निघून जाते.
- एका संशोधनानुसार सकाळी नाश्ता केल्यानं टाइप २ प्रकारच्या मधुमेहाचा धोका हा 30 % ने कमी जाणवतो. 

फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे

का आवश्यक आहे नाश्ता
नाश्ता शरीराला उर्जा देतो. सकाळी घेण्यात आलेल्या नाश्त्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह,  ब जीवनसत्त्व, प्रथिनं, कर्बोदकं असतात.  जी शरीराला दिवसभरासाठी अत्यावश्यक असतात. सकाळी  नाश्ता केल्यानं शरिरातील उर्जेची कमतरता भरून निघते. 

फळं खाणे फायदेशीर 
सकाळी नाश्त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यावरून अनेक मतमतांतरे आहे. प्रत्येक  राज्याची वेगळी अशी खाद्यसंस्कृती आहे. या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव नाश्त्यातील पदार्थांमध्ये आढळतो.  महाराष्ट्रात उपमा, पोहे, पोळी भाजी, घावणे, आंबोळ्या  सारख्या पदार्थांचा नाश्त्यात सहभाग असतो तर दक्षिणेकडे इडली, मेदू वडा उत्तप्पा असे पदार्थ नाश्त्यासाठी खाल्ले जातात.
याव्यतिरिक्त हंगामी फळं हा नेहमीच नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते  जी शरीराला उर्जा पुरवते. त्यामुळे त्या त्या  हंगामात येणाऱ्या फळांचा किंवा फळांच्या रसांचा समावेश तुम्ही नाश्त्यात करू शकता. मात्र सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्किट नाश्ता म्हणून खाणं आवर्जून टाळा.