पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मधुमेहच्या रुग्णांनी ही फळे जपून खा

फळे

मधुमेह झालेल्या व्यक्तींनी आहारात पथ्य पाळावीत असा सल्ला नेहमीच डॉक्टरांकडून दिला जातो. आहारात समाविष्ठ करण्यात आलेल्या पदार्थांमुळे अनेकदा रक्तातील शर्करा वाढते त्यामुळे मधुमेह असलेल्या  व्यक्तींनी काही फळं ही जपून खाण्याचा सल्ला दिला जातो. ही फळे कोणती ती पाहू.

फळं कधीही खाऊ शकतो?, वाचा आहारतज्ज्ञ काय म्हणतात

केळी 
केळी ही शरीरास उर्जा पुरवतात, केळ्याचा सेवनानं शरीरातील शर्करेचं प्रमाण वाढतं. ज्यांना अती मधूमेह आहे अशा रुग्णांनी गोड केळ्यांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. 

आंबे 
एका पिकलेल्या आंब्यात जवळपास ४५ ग्रॅम नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे मधूमेहाच्या रुग्णांनी आंबे खाणं टाळावं.

चेरी 
एक कप चेरीत १८  ग्रॅम नैसर्गिक शर्करा  असते, जी मधूमेहच्या रुग्णांसाठी खूपच हानिकारक असते. 

Health Tips : हे पाच पदार्थ तुमचा उदास मूड करतील ठिक

द्राक्षे 
द्राक्षातही शर्करचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मधुमेहच्या रुग्णांनी मर्यादेत द्राक्षाचं सेवन करावं. 

लिची 
लिचीमध्ये  असलेल्या नैसर्गिक शर्करेमुळेही रक्तातली शर्करेची पातळी वाढू शकते त्यामुळे लिची बेतानं खावी.