पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Health Tips : चिकनसोबत हे तीन पदार्थ खाणं टाळा

चिकन

आहारात नेहमीच विविध पदार्थांचा समावेश असायला हवा. आमटी, भाजी, भात, पोळी, कोशिंबीर, ताक यांसारख्या सकस पदार्थांनी आपलं ताट नेहमीच भरलेलं असावं असं डॉक्टर नेहमी सांगतात. मात्र अनेकदा काही पदार्थांसोबत ठराविक पदार्थ खाणं हे नेहमीच टाळावं, अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं  तर चिकन. अनेकजणांच्या आहारात चिकनचा समावेश असतो, मात्र चिकनच्या जोडीला हे तीन पदार्थ खाणं आवर्जून टाळा. 

महिला चांगल्या पगाराची नोकरी का सोडतात? वाचा अहवाल काय म्हणतो

दही 
चिकनच्या अनेक पारंपारिक  पाककृती तयार करताना त्यात दही हे वापरतात. अशा पाककृती करताना दही हे चिकनसोबत शिजवलं जातं. मात्र हेच दही थंड असताना चिकनसोबत न खाण्याचा सल्ला दिला जातो. चिकन हे उष्ण असतं, तर दही थंड. चिकन खाल्ल्यानं पोटाला गरम पडतं त्यावर थंड दह्याचं सेवन केल्यानं दोघांच्या विषम गुणांमुळे पचन क्रियेवर परिणाम होतो. 

मासे
मासे आणि मांस हे दोन्ही पदार्थ प्रथिनांचा स्त्रोत आहेत. या दोघांमध्ये विविध प्रकारची प्रथिनं असतात. या दोन्ही पदार्थांचं सेवन एकत्र केल्यावर त्रास होऊ शकतो त्यामुळे एकत्र न खाण्याचा सल्ला दिला जातो.

दूध
दूध आणि चिकन यांचं एकत्र सेवन केल्यामुळे अॅलर्जी किंवा अन्य त्रासही होऊ शकतात त्यामुळे या दोन्ही पदार्थांचं एकत्र सेवन करणं टाळावं. 

... म्हणून पुदिन्याचा रोजच्या आहारात समावेश करणे उपयुक्त