लसूण जेवणाची चव वाढवते पण त्याचबरोबर लसणीत अनेक औषधी गुणधर्मदेखील आहेत. रिकाम्या पोटी लसूण खाल्ली तर त्याचे अनेक फायदे आरोग्यास होवू शकतात. हे फायदे कोणते ते पाहू.
उच्च रक्तदाबापासून सुटका
लसूण रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबापासून सुटका मिळते. त्यामुळे उच्च रक्तादाब असलेल्यांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
पोटाचे त्रास कमी होतात.
पोटाच्या अनेक तक्रारी लसणीचे सेवन केल्यानं कमी होतात. उकळलेल्या पाण्यात लसणीच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यावे यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
लसणीमुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.
पचनशक्ती सुधारते
रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पचनशक्ती सुधारते. यामुळे भूक चांगली लागते.
सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुटका
लसणीमुळे सर्दी- खोकला, अस्थमा यांसारखे त्रास कमी होतात.