काळी मिरी हा मसाल्यामध्ये वापरला जाणारा प्रमुख जिन्नस होय. पूर्वी काळी मिरीला युरोपीय बाजारात सोन्याइतकाच भाव होता याचे दाखले आपण इतिहासात वाचतो. केवळ अन्नपदार्थांची चवच नाही तर अनेक औषधी गुणधर्मही काळी मिरीत आहेत. काळ्या मिरीचे व्यापारी हे त्यावेळी सर्वात श्रीमंत व्यापारांपैकी एक म्हणून गणले जायचे. चला तर मग जाणून घेऊ काळ्या मिरीची फायदे.
नाश्ता करताना या चुका आवर्जून टाळा
- सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत काळी मिरी खाल्ली तर शरीरास याचा खूपच फायदा होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आरोग्य सुदृढ होतं त्याचप्रमाणे कफ, पित्त, गॅस यांचा त्रास उद्भवत नाही.
- गरम पाण्यासोबत काळी मिरी खाल्लानं शरीरातील फॅट्स कमी होतात. ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते.
- गरम पाण्यासोबत काळी मिरी खाल्ल्यास अॅसिडिटीची समस्याही कमी होते.
हेल्थ टिप्स : गाढ झोपेसाठी हे उपाय नक्की करून पाहा
- कफचा त्रास होत असल्यास काळी मिरीचं सेवन फायदेशीर आहे. वारंवार कफाचा त्रास होत असल्यास एक कप पाण्यात लिंबाचा रस, काळी मिरी चूर्ण आणि थोडसं मीठ घालून घेतल्यास कप आणि गॅसचे त्रास दूर होतात.
- गरम पाण्यासोबत काळ्या मिरीचं सेवन केल्यानं डिहाइड्रेशनचा त्रास आणि त्यातून येणारा थकवा जाणवत नाही.