पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फणस खाण्याचे हे आहेत दहा फायदे

फणस

उन्हाळ्यात  बाहेरून काटेरी पण आतून मधुर असणारे  फणस सहज दिसतात. विशेषत: कोकणातून हे फळ बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. कोकणाबरोबरच बंगळुरू, गोव्यातही फणसाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात.

 फणसामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे पण त्याचबरोबर फणसात प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय आणि  पिष्टमय पदार्थही असतात.

फणस हे पौष्टिक असल्या कारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे. 

फणसात प्रथिनांची मात्रा अधिक असते त्यामुळे फणस खाल्ल्यानं पोट भरतं आणि जास्त भूक लागत नाही.

सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी फणसाच्या पानांच्या रसाचं सेवन करावं 

फणसाच्या गराबरोबरच फणसाची आठळीही फायदेशीर आहे ती  भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.

थायरॉइडची समस्या असणाऱ्यांसाठी फणस फायदेशीर आहे यामध्ये  असलेल्या सूक्ष्म खनिज आणि लोहामुळे चयापचय समस्या सुधारते . 
 व्हायरल इन्फेक्शनवरही फणस फायदेशीर आहे. 

फणसात असलेल्या पॉटेशिअममुळे हृदयाचं आरोग्यही तंदुरुस्थ राहतं. 

फणसाच्या आठळ्यांपासून तयार झालेल्या चुर्णात मध मिसळून त्याचा फेसपॅक करता येतो  तो चेहऱ्यावर लावल्यानं चेहऱ्यावरचे डाग निघून जातात. 

फणसाचा चीक शरीरावरील बेंडसाठी उपयोगी आहे. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी तो लवकर  बरा होतो.