आयुर्वेदानुसार आले हे जेवणाची चव वाढवते पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही तितकंच गुणकारी असतं. आल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. त्यात अॅसिडिटीचा समावेश आहे. बदलत चाललेली जीवनशैली, अवेळी जेवण्यानं अनेकांना अॅसिडिटीचा त्रास संभावतो यासाठी आले ही गुणकारी आहे, चला तर पाहू आल्याचे काही विशेष फायदे
जांभई देणे का अडवू नये? असे केल्यास काय होते?
- ज्यांना अन्न पचनाची समस्या आहे अशा व्यक्तीनं आले कुटून ते मध किंवा तूपासोबत घ्यावं यामुळे आराम पडतो. अन्नपचन नीट न झाल्यानं गॅस, छातीत दुखणं, अॅसिडिटी सारख्या अनेक समस्या उद्धभवतात यावर आले गुणकारी आहे.
- आल्याच्या तुकड्याला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी ते खाल्यास तोंडाची गेलेली चव परत येते. तसेच चांगली भूकही लागते.
- डोकं दुखत असेल तर आल्याचे चूर्ण किंवा आलं ठेचून ते गरम पाणी आणि हळद मिसळून त्याचा लेप डोक्यावर लावाला यामुळे डोकेदुखी कमी होते.
सणासुदीसाठी घराचा मेकओव्हर करण्यासाठी पाच सोप्या टीप्स
- सतत खोकला येत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे, खोकला थांबतो.
- मात्र ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी याचा वापर जपून करावा.