पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाश्ता करताना या चुका आवर्जून टाळा

नाश्ता

सकाळचा नाश्ता हा नेहमीच भरपेट करावा अगदी राजासारखा असं म्हणतात. सकाळचा नाश्ता हा दुपार आणि संध्याकाळच्या जेवणापेक्षाही अत्यावश्यक आहे. सकाळी प्रत्येकाला ऑफिस, शाळा, कॉलेजमध्ये जाण्याची घाई असते.  अशा वेळी  सकाळचा नाश्ता होतच नाही. अनेकजण अत्यंत अल्प नाश्ता करून  निघतात. काहीवेळा नाश्ता करताना अनेक चुकीच्या गोष्टीही केल्या जातात तेव्हा सकाळचा नाश्ता करताना काही गोष्टी आवर्जून टाळा.

चहा कॉफी घेणं टाळा
सकाळचा नाश्ता  करताना चहा, कॉफी घेणं आवर्जून  टाळा. काही जण  चहा किंवा कॉफी घेताना त्यात क्रिम घालून ती पिणं पसंत करतात मात्र यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

नाश्ता करताना  जंक फूड टाळा
नाश्ता शरीराला उर्जा देतो. सकाळी घेण्यात आलेल्या नाश्त्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह,  ब जीवनसत्त्व, प्रथिनं, कर्बोदकं असतात.  जी शरीराला दिवसभरासाठी अत्यावश्यक असतात. सकाळी  नाश्ता केल्यानं शरिरातील उर्जेची कमतरता भरून निघते. अशावेळी नाश्त्यात भरपूर पोषक तत्व असलेल्या  पदार्थांचा समावेश करा.
नाश्त्यात पिझ्झा, पेस्ट्री, बर्गर सारख्या जंकफूडचा समावेश करणं टाळा. 

भरपूर मीठ टाकून पदार्थ खाणं टाळा
सकाळी नाश्त्यामध्ये अनेकजण सॅलेड किंवा मोड आलेल्या धान्यांची कोशींबीर खाणं पसंत करतात. यात भरपूर पोषण मुल्य असतात. मात्र या पदार्थांमध्ये वरून भरपूर मीठ घालून खाणं टाळा. मीठ शरीरास हानिकारक असतं. 

लक्ष केंद्रीत करा
नाश्ता करताना केवळ  एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. अनेकांना नाश्ता करताना पेपर वाचायची,  टीव्ही मोबाईलमध्ये पाहण्याची सवय असते. दहा मिनिटे या सर्व गोष्टी टाळा आणि अन्न मनापासून खा.

काय खावं नाश्त्यात 
सकाळी नाश्त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यावरून अनेक मतमतांतरे आहे. प्रत्येक  राज्याची वेगळी अशी खाद्यसंस्कृती आहे. या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव नाश्त्यातील पदार्थांमध्ये आढळतो.  महाराष्ट्रात उपमा, पोहे, पोळी भाजी, घावणे, आंबोळ्या  सारख्या पदार्थांचा नाश्त्यात सहभाग असतो तर दक्षिणेकडे इडली, मेदू वडा उत्तप्पा असे पदार्थ नाश्त्यासाठी खाल्ले जातात.
याव्यतिरिक्त हंगामी फळं हा नेहमीच नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असते  जी शरीराला उर्जा पुरवते. त्यामुळे त्या त्या  हंगामात येणाऱ्या फळांचा किंवा फळांच्या रसांचा समावेश तुम्ही नाश्त्यात करू शकता. मात्र सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्किट नाश्ता म्हणून खाणं आवर्जून टाळा.