पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागच रहस्य सांगतोय अक्षय

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाची पंन्नाशी ओलांडलेला अक्षय हा बॉलिवूडमधला फिट अभिनेता आहे. ना कोणतंही व्यसन, ना वाईट सवयी अशी ओळख अक्षयची आहे. पहाटे लवकर अक्षयच्या दिनक्रमाला सुरूवात होते. 

हा 'फिटनेस फंडा' मिथिला करते नेहमीच फॉलो

व्यायाम, योग्य आहार या सर्व गोष्टीला अक्षय खूपच महत्त्व देतो. बॉलिवूडच्या पार्टीत अक्षय क्वचितच दिसतो. अनेक तरुणांसाठी अक्षय 'फिटनेस गुरू'पेक्षा कमी नाही. त्यामुळे आपल्या वाढदिवशी अक्षयनं तरुण दिसण्याचं रहस्य त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे. 

Health tips: मनुके खाल्ल्याने होतात हे सहा फायदे

' खूप पाणी आणि घरचं अन्न या दोन गोष्टी उत्तम आरोग्याचं रहस्य आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कृत्रिम गोष्टींची आवश्यकता नाही, मी आणि धावपटू हिमा दास या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहोत. चांगली शरिरयष्टी  स्टेरॉयड, सप्लीमेंटमुळे होत नाही. सोप्पा मार्ग किंवा तात्पुरत्या राहणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. चांगलं आरोग्य हे मेहनतीनं मिळतं, त्यासाठी मेहनत घ्या. कृत्रिम गोष्टी निवडून तुम्ही आयुष्य कमी करत आहात. आपल्या शरीराची मंदीर समजून पूजा करा, त्याचं आरोग्य जपा असा सल्ला अक्षयनं तरुणांना दिला आहे.